Blog Details | Dr. Gautam Gangurde (Plastic, Reconstructive & Cosmetic Surgeon) | FUT | FUE | BODY Hair | PRP | beard hair transplant Nasik, hair treatment nasik , beard shaping , beard fue gujarat , beard hair transplant india ,body hair transplant india, hair transplant delhi , fue in nasik, best hair transplant in maharashtra , hair transplant dubai , hair transplant uae , hair transplant mumbai , hair transplant australia , hair tranplant pune , best hair transplant in nasik , hair loss treatment , prp therapy in nasik , prp injection nasik , hair analysis nasik , hair transplant in maharashtra, FUT NASIK , fue in uae gulf countries , medical tourism india hair transplant ,fue nasik , full head hair transplant, body hair transplant ,Cosmetic Surgery Nasik , cosmetic surgeon in maharashtra , cosmetic surgery maharashtra , cosmetic surgeon in nasik, FUT , FUE NASIK , hair loss in female , female baldness, derma roller ,mesotherapy for hair , DHI NASIK

सौंदर्यवृद्धीसाठी कॉस्मेटिक सर्जरी
Dec 4 2016 10:51AM

सुंदर व आकर्षक दिसणे ही आता फक्त उच्चभ्रू वर्गाची किंवा सिनेतारकांची मक्तेदारी राहिलेली नाही आहे. आजकालच्या प्रेसेंटेशन आणि कॉम्पिटिशनच्या युगात कॉलेजात जाणारी तरुण मुले - मुली असो की, कॉर्पोरेट हाऊस मध्ये काम करणारा  मध्यम वयीन नोकरदार वर्ग असो की, घर प्रपंच चालवणारी गृहिणी असो, किंवा  सेवानिवृत्तीनंतर उर्वरित आयुष्याचा आनंद हेणारी वयोवृध्द असो, या सर्वांनाच सुंदर, आकर्षक व सुडोल दिसण्याची मनोमन इच्छा असते. त्यासाठी ते नेहमीच शोधात असतात पण नेमके काय केले पाहिजे व काय करता येऊ शकते हे किंबहुना माहीत नसते.

कॉस्मेटिक सर्जरी हि प्लास्टिक सर्जरीची एक उपशाखा आहे. सौंदर्य वृद्धी साठी करण्यात येणाऱ्या सर्व ऑपरेशन चा यात अंतर्भाव होतो. यात नाकाचा आकार सुधारणे, जाड ओठ  पातळ करणे वा पातळ ओठांना 'पाऊट' देण्यासाठी फुगीरपणा आणणे, तोंडाच्या आतून ऑपरेशन करून गालावर सुंदरशी खळी पाडणे, अर्धवट मिटलेली पापणी टोसीस सर्जरीने उघडणे,हनुवटीचा आकार प्रमाणात आणणे, हनुवटी खालील 'डबल चिन' लाय्पोसक्शन ने काढून टाकणे, तसेच शरीराच्या कुठल्याही भागावरील अतिरिक्त चरबी  कायमची काढण्यासाठी लाय्पोसक्शन हि शस्त्रक्रिया वरदानच ठरते. 

वार्धक्याच्या खुणा पुसून टाकण्यासाठी फेस लिफ्ट, फोरहेड लिफ्ट, डोळ्याभोवतीचा फुगीरपणा कमी करण्यासाठी ब्लेफेरोप्लास्टी या शस्त्रक्रिया वापरल्या जातात. चेहऱ्यावरील छोट्या सुरकुत्या, कपाळावरील, भुवया जवळील आठ्या 'बोटोक्स' इंजेक्शनने चुटकीसरशी घालवता येतात. 

लाय्पोसक्शन - ही शस्त्रक्रिया शरीरावरील अतिरिक्त चरबी काढून टाकण्यासाठी करून घेतली जाते. हनुवटी, पोट, नितंब, मांडी, खांद्यांची मागची बाजू या भागावरील चरबी या शस्त्रक्रियेणे प्रामुख्याने काढली जाते. लठ्ठपणा झटकन घालण्यासाठीचा पर्याय म्हणून युवती याकडे बघतात. 

अब्दोमिनोप्लास्टी ( टमी  टक ) - दोन किंवा तीन गर्भारपणा नंतर महिल्याचे पोटावर अतिरिक्त चरबी जमा होते आणि पोटाचे स्नायू शिथिल होतात त्यामुळे खालील पोटाचा भाग लोमकळल्यासारखा दिसतो. पोटावरील अतिरिक्त चरबी आणि कातडी काढून  पोटाच्या स्नायूंना बळकटी ही अब्दोमिनोप्लास्टी 
( टमी  टक)  या शस्त्रक्रियेने देता येते.

हेअर ट्रान्सप्लांट ( केस प्रत्यारोपण ) - केस गळणे आणि त्यामुळे केसांची घनता कमी होणे हा तर एक सर्वांनाच  त्रस्त करणारा प्रश्न आहे. केस गळल्यामुळे आपण वयोवृद्ध दिसू लागतो. दीर्घकाळ औषधे उपचार घेऊनही टक्कल पडले असेल तर त्यावर हेअर ट्रान्सप्लांट ( केस प्रत्यारोपण ) हा एक उपाय असू शकतो.

फेसलिफ्ट - त्वचेवरील सुरकुत्या आणि सैल पडलेली त्वचा तुमचे वय सांगत असते. म्हणूनच टाईट, प्लेन त्वचा मिळवण्यासाठी ही केली जाते. यातही ब्रोलीफ्ट (भुवया उंचावणे) नेक लिफ्ट ( मानेजवळील त्वचा), आयलीड रिपेअर ( पापणीचा आकार बदलणे ) अशा शस्त्रक्रिया केल्या जातात. 

ऱ्हिनोप्लास्टी - बसके नाक धारधार करणे किंवा पोपटासारखे नाक असेल तर त्याचा अणकुचीदारपणा कमी करणे ... थोडक्यात "नोझ शेपींग " साठी ही शस्त्रक्रिया केली जाते. सध्याच्या काही बॉलिवूड स्टारने ही शस्त्रक्रिया केलेली दिसून येत असल्यामुळे सर्वात पॉप्युलर शस्त्रक्रिया म्हणून ती औळखली जाते.
 
लिप्स सर्जरी - काहींचे ओठ इतके पातळ असतात की, वरचा किंवा खालचा ओठ दिसतच नाही तर काहींचे ओठ प्रमाणापेक्षा जाड असतात. अशा वेळी प्रमाणबद्ध ओठांसाठी ही शस्त्रक्रिया केली जाते. याला "लिप्स ऑगमेंटेशन " असे म्हणतात. इंजेकशनद्यारे ओठांमध्ये हायलुरॉनिक ऍसिड सारखे घटक पदार्थ पोहोचवून ओठांचा आकार बदलला जातो. 

डिम्पल क्रिएशन - हसल्यावर गालावर पडणारी खाली हे केवळ सौंदर्याचे प्रतीक मानले जात नाही,  तर ज्यांच्या गालावर खाली पडते ती व्यक्ती नशीबवान समजली जाते. म्हणून डिम्पल क्रिएशन नावाची शस्त्रक्रिया उदयास आली आहे. आता अशी खाली पडून घेऊन नशीब कसे बदलते, देव जाणे... 
चीक सर्जरी - थोडा नजीक किंवा त्रिकोणीय चेहरा नेहमीच " यंगर लूक " देतो; मात्र काहींचा चेहरा खूपच गोल, चरबीयुक्त असतो. अशा वेळी हनुवटीजवळची चरबी कमी करणे, गालाच्या  हाडांचा आकार कमी करण्यासाठी ही शस्त्रक्रिया  केली जाते.

ऑटोप्लास्टी - बाहेर आलेले कान आत करणे, कानाचा आकार बदलणे किंवा लांबच लांब आणि वजनाला जड कानातले घालून घालून फाटलेली कानाची पाळी शिवने , अशा शस्त्रक्रिया या प्रकारात केल्या जातात. 

बोटॉक्स – बोट्युलिन टॉक्सिन पासून  एक विशिस्ट औषध तयार करून ते शरीराच्या काही भागावरील सुरकुत्या घालवण्यासाठी वापरले जाते. 

योग्य कॉस्मेटिक सर्जन्सचा शोध घ्या. इंटरनेटवर आज बरीच माहिती उपलब्ध असते. 
सर्जन्सच्या पदव्या तपासून पहा. आजकाल कामचलाऊ कॉस्मेटिक डिग्री लावणारे भरपूर पाहायला मिळतात त्या पासून सावध रहा. 
आपल्याला करावयाची असलेली कॉस्मेटिक सर्जरीची सविस्तर माहिती करून ह्यावी आणि त्या संबंधीत पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचे निरसन आपल्या  कॉस्मेटिक सर्जन्सकडून करून हावे.